महाराष्ट्र
गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकांचा नदीपात्रात पाण्यात वाहुन २२ वर्षीय युवकाचा मृत्यू : मृतदेह शोधमोहीमेस तब्बल २४ तासानंतर सापडला..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : दिनांक १९ सष्टेंबर २०२१ रोजी दुपारी २ ते २.३० वा. दरम्यान घरगुती गणपती विसर्जनासाठी लोढी गल्ली लष्कर सोलापूर येथील २२वर्षीय युवक सागर अमीरसिंग मदनावाले या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सीना नदीपात्रात पाण्यात वाहुन गेल्याची घटना काल उत्तर सोलापूर तालुक्यातील शमसापुर येथे घडली.तेंव्हापासुन शोध मोहीम दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वा. दरम्याने शोध मोहीम सुरू झाली होती.साधारणपणे ४ वाजण्याच्या सुमारास शमसापुर पासुन म्हजेच घटनास्थळापासून १ ते २ कि.मी अंतरावर सागर अमीरसिंग मदनावाले यांचे मृतदेह सापडला.
यावेळेस तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिपक दळवी साहेब व उत्तर सोलापूर तालुक्याचे तहसिलदार जयवंत पाटील यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी. सोलापूर महानगरपालिकेचे अग्नीशामक दलाचे कर्मचारी वर्ग व गणेश पवार,समाधान कांबळे, ज्ञानेश्वर भोई,बालाजी भोई,परमेश्वर भोई,लक्ष्मण मल्लाव मोहोळ तहसील पथक टिम.सोलापूर महानगरपालिकेचे प्रभाग १७ चे सर्व नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले होते.
यावेळेस तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिपक दळवी यांच्या पथकाने मृतदेहाचे पंचनामा करून मृतदेह pm साठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment