महाराष्ट्र
टाकळी ग्रामस्थांकडून आमदार सुभाष बापू देशमुख यांना गावातील विविध विकास काम करण्यासाठी निवेदन..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीकडून दक्षिण सोलापूर तालुक्यात आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत सेवा समर्पन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
याचेच औचित्य साधून आज आमदार सुभाष देशमुख हे टाकळी येथे आले असता गावातील नागरिकांकडून आ.देशमुख यांना विविध विकास कामे करण्यासंबधी निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने टाकळी येथील महावितरण उपकेंद्र पासुन ते पाटील वस्ती हा रस्ता लवकरात लवकर करून देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.कारण या रस्त्यावर कायम स्वरूपी रहदारी मोठ्या प्रमाणात आहे हा रस्ता तात्काळ होणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
याला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार सुभाष देशमुख यांनी मी जातीने लक्ष घालुन हा लवकरात लवकर होण्याकरिता प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून संबंधित खात्याचे अधिकारी यांना सुचना करून हा रस्ता करून घेण्यासंबधीचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी तालुका सरचिटणीस यतीन शहा, पक्षनेते अण्णाराव बाराचारी, जेष्ठ नेते हणमंत कुलकर्णी सर, पंचायत समिती सदस्य संदीप टेळे, टाकळीचे उपसरपंच सिध्दाराम घोडके, ग्रामपंचायत सदस्य सोमनिंग कमळे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी, सुभाष बगले, सागर कलशेट्टी, प्रकाश सुरळे, सतीश कोळी, संगमेश्वर बगले, महानतेश बिराजदार, राजु बिराजदार, गुरबाळा पाटील, पंडीत पाटील, धोडप्पा अनची, मल्लिकार्जुन बिज्जर्गी, मल्लिकार्जुन दिवटे, बोल्लप्पा कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment