सामाजिक
एम.के.फाउंडेशन कडून अनाथ, बेघर मुलांना दिवाळी सणा निमित्त कपडे वाटप..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते प्रसाद मोहिते यांच्या प्रार्थना फाउंडेशनच्या प्रकल्पात शिक्षण घेणाऱ्या अनाथ, बेघर मुलांचा दिवाळी सण आनंदात साजरा व्हावा यासाठी एम.के.फाउंडेशन कडून कपडे भेट म्हणून देण्यात आले.
गरजू मुलांना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या शुभहस्ते कपड्यांचे वाटप करण्यात आले. एम.के.फाउंडेशनच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमांची माहिती वृत्तपत्रात वाचत असतो, खूपचं कौतुकास्पद कार्य चालू आहे अशी भावना दिलिप स्वामी यांनी व्यक्त केली.
समाजात असे अनेक घटक आहेत,ज्यांना आपल्या संस्कृतीतील मोठ्या समजल्या जाणाऱ्या सणाला कपडे घेण्याची सुद्धा कुवत नसते,अश्या मुलांना सणासुदीच्या काळात अडचण भासू नये,दिवाळी गोड व्हावी यासाठी प्रकल्प संचालक प्रसाद मोहिते व त्यांच्या टीमच्या सहकार्याने एम.के.फाउंडेशनचे संस्थापक महादेवजी कोगनुरे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत कपड्यांचे वाटप करण्यात आले.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment