कार्तिक वारी काळात यात्रेकरूंना पंढरपूर नगरपरिषदेमार्फत काळजी घेण्याचे आवाहन
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी सोलापूर दि. 12 :- पंढरपूर शहरामध्ये कार्तिक शुध्द एकादशी दि.15.11.2021 आहे. ह्या निमित्त भरणारी कार्तिकी यात्रा दि.08 नोव्हेंबर 2021 ते 19 नोव्हेंबर 2021 या कालावधीत होणार आहे. पंढरपूर येथे आल्यानंतर नागरिकांनी सार्वजनिक जागेत घाण करु नये. शौचासाठी नगरपालिकेने बांधलेल संडासचा उपयोग करावा. नदीचे पात्रात, सार्वजनिक जागेत,अगर बाहेर कोठेही शौचास बसू नये.उघड्यावर शौचविधी करणाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येइल.नदीपात्रामध्ये शौचास बसू नये किंवा नदीचे पात्र प्रदूषीत होईल असे कृत्य करू नये. असे कृत्य करणाऱ्यां विरुध्द मुंबई पोलीस कायदा कलम 115 अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
तसेच नदी मध्ये वाहने, जनावरे धुणे, कचरा टाकने असे कृत्य करु नये.यात्रेकरुंनी नदीचे, बोअरचे पाणी पिऊ नये, नळाचेच पाणी प्यावे नासकी,कच्ची फळे खाऊ नयेत, शिळे अन्न खाऊ नये.कचरा, कचरा पेटीतच टाकावा. सार्वजनिक रस्त्यावर किंवा मोकळया जागेत कचरा टाकू नये घंटागाडी कडे द्यावा. दशमी,एकादशी व द्वादशी या दिवशी घेटागाडी सकाळी व रात्री अशी दोन वेळा निघेल याची घरमालक, मठाधिपती व नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच शहरातील नागरिकांनी आपली जानवरे मोकाट सोडु नयेत बांधुन ठेवावीत मोकाट जनावरे व त्यांचे मालक यांचेवर कायदेशिर कारवाई केली जाईल. यात्रेकरूंनी झाकुन ठेवलेले व ताजे अन्नपदार्थ खावेत. नदीचे पाणी पिऊ नये. न.पा.टोल फ्री नंबर 18002331923

Leave Comments
Post a Comment