सैनिकी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

सैनिकी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन


 

समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी             सोलापूर,दि.8: आदिवासी विकास विभागांतर्गंत असलेल्या श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्‍च माध्‍यमिक विद्यालय तुळजापूर, उस्मानाबाद या सैनिकी शाळेत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इ.6 वीमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश घेण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले आहे.

            सैनिकी  शाळेतील वसतिगृहामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष प्रति विद्यार्थी साहित्य मोफत पुरविण्यात येते.

शालेय गणवेश (2), कवायतीचे गणवेश (2), शाळेचे बुट/मोजे 1संच, कवायतीचे बुट/ मोजे 1 संच, टॉवेल 1, मुलांना कुर्ता-पायजमा 2, अंगवस्त्रे 2 जोडी, दंतमंजन साबण तेल इत्यादी.

याचबरोबर दीर्घ सुट्टी काळात मुळ गावी जाण्या-येण्याचा खर्च 2 वेळा, लेखन साहित्य, उदा. वह्या, कंपास, पेटी, पेन, पेन्सिल, दप्तर इ. , दैनंदिन किरकोळ खर्च प्रती महिना 50 रूपये (10 महिन्यासाठी)

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी फक्त मुले सन 2021 -22 या शैक्षणिक वर्षात सैनिकी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन श्रीमती आव्हाळे यांनी केले आहे.

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads