महाराष्ट्र
जनाई फाउंडेशन तळे हिप्परगा या समाज सेवी फाउंडेशन च्या वतीने तळे हिप्परगा गावांतील जि .प .प्राथमीक शाळा, हर्षवर्धन हायस्कूल, शिवालय आश्रमशाळा, तसेच मशरूम गणपती या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : नुकत्याच संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा सुरू झाल्या कारणाने नेहमीच सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेली जनाई फाउंडेशन तळे हिप्परगा या समाज सेवी फाउंडेशन च्या वतीने व उद्योजक राजेंद्र दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तळे हिप्परगा गावांमध्ये जि .प .प्राथमीक शाळा, हर्षवर्धन हायस्कूल, शिवालय आश्रमशाळा, तसेच मशरूम गणपती या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.
तसेच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना लाडू चे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रम राजेंद्र दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेले राजू मालक हौशेट्टी यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जनाई फौंडेशनचे कार्यकर्ते नितीन वाघमारे, शेरा पटेल अतिश पाटोळे नितीन दराडे कृष्णा कांबळे अमोल पाटोळे श्रीकांत भिंगारे आप्पा काटे व फाउंडेशनचे अध्यक्ष नागनाथ काटे, विकी शेंडगे यांनी परिश्रम घेतले.सदर कार्याचे गावातून शाळेतून कौतुक होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment