महाराष्ट्र
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर रुपाभवानी मंदीर ट्रस्ट व स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : दि. 13 आक्टोंबर 2021 रोजी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर रुपाभवानी मंदीर ट्रस्ट व स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन सोलापूर तुळजापूर नाका येथील रुपाभवानी मंदिरात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मल्लिनाथ लातुरे (अध्यक्ष) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद (बंडु) पवार हे होते.तसेच या शिबिराचे महत्वाचे उद्देश प्रोग्राम ऑफिसर विरेंद्र परदेशी यांनी अधिक माहिती पत्रकाराशी बोलताना दिली.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून MO सीमा शेख,प्रशांत चाबुकस्वार,संताजी भोये,रवि हाक्के,दत्तात्रय बारामतीकर,आप्पासाहेब कानाळे,पोग्राम ऑफिसर विरेंद्र परदेशी,प्रशांत चाबुकस्वार,यल्लाप्पा पुजारी,रावसाहेब चौगुले यांच्यासह आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेंद्र परदेशी यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रशांत चाबुकस्वार यांनी मांडले.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment