महाराष्ट्र
एम.के.फाउंडेशनच्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत खुल्या गटात सागर गड्डी तर लहान गटात प्रीती व्हटकर प्रथम.
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या औचित्य साधून एम.के फाउंडेशनच्या वतीने "जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे" आयोजन करण्यात आले होते. आज स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ प.पु.ष.ब्र.रेणुका शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते व जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पाडला.
यावेळी एम.के.फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे,दक्षिण सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरीष पाटील,हिंदू धनगर सेनेचे अध्यक्ष अमोल कारंडे,परमेश्वर माळगे,राजशेखर सगरे, प्रभाकर दिंडुरे,नरसप्पा दिंडुरे, अनिरुद्ध गोगरधरे मोतीराम राठोड,महादेव हुळळे भुताळसिद्ध बाराचारी,गुरिलिंग अचलेर,रेवनप्पा भैरमडगी आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत ४९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सूर्यकांत छत्रबंद व प्रा.सोमनाथ सूर्यवंशी यांनी केले.
चित्रकला स्पर्धेत खुल्या गटात सागर गड्डी (प्रथम),अजय मानकोजी (द्वितीय),नम्रता अंदाणे (तृतीय) व लक्ष्मण तवटम (उत्तेजनार्थ) क्रमांक तर लहान गटात प्रीती व्हटकर (प्रथम), अर्पिता बाबानगरे (द्वितीय), साक्षी नळे (तृतीय) व उत्तेजनार्थ म्हणून अक्षय पुल्लूर यांची विजेते म्हणून निवड करण्यात आली होती.
वैष्णवी सिटी येथील एम.के.फाउंडेशनच्या कार्यालयासमोर प्रांगणात बक्षीस वितरण समारंभ पार पाडला. यावेळी सर्व विजेत्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिकार्जुन दारफळे यांनी तर आभार संतोष उकरंडे यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment