पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नियोजन समितीकडून सन 2020-21 जिल्हा वार्षिक योजनेच्या 574 कोटीच्या खर्चास मान्यता जिल्‍हा वार्षिक योजना सन 2021-22 चा 625 कोटीचा निधी विहित वेळेत खर्च करावा :-पालकमंत्री दत्तात्रय भरणे - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नियोजन समितीकडून सन 2020-21 जिल्हा वार्षिक योजनेच्या 574 कोटीच्या खर्चास मान्यता जिल्‍हा वार्षिक योजना सन 2021-22 चा 625 कोटीचा निधी विहित वेळेत खर्च करावा :-पालकमंत्री दत्तात्रय भरणे


     ♦️  जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या विकासाची नोंद घेऊन निधीचा पुरवठा करणार

        ♦️ महापालिकेच्या हद्दवाढ भागातील 36 शाळांच्या दुरुस्ती करता पहिल्या टप्प्यात दोन कोटीचा निधी मंजूर

      ♦️   जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी खंडित करू नये

      ♦️  राज्यात ऑक्सीजन निर्मितीत स्वयंपूर्ण झालेला सोलापूर जिल्हा प्रथम

       ♦️ राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज पुरवठा केला पाहिजे

       ♦️  रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामे प्रस्तावित करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा

       ♦️  सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीच्या कामाच्या अनुषंगाने स्वतंत्र बैठकीचे आयोजन

     ♦️  ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नावाने राज्य स्तरावरून योजना जाहीर करण्यासाठी नियोजन समितीकडून ठराव मंजूर

       ♦️  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात भरघोस निधी दिल्याबद्दल सदस्याकडून अभिनंदनाचा ठराव

 

समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी                सोलापूरदि.25  :- जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत सर्वसाधारण 470 कोटीअनुसूचित जाती उपयोजना 151 कोटी 10 लाख व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 4 कोटी 15 लाख असा एकूण 625 कोटी 25 लाखाचा जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर असलेला निधी सर्व संबंधित यंत्रणांनी विहित कालमर्यादेत व मंजूर असलेल्या कामावर खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

       जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. भरणे मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळेखासदार डॉ. जय सिद्धेश्वरखासदार ओमराजे निंबाळकरजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरमहापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकरजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामीपोलीस उपायुक्त दीपाली धाटेअतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधवजिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे उपस्थित होते.

     पालकमंत्री भरणे पुढे म्हणाले कीजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत यावर्षीही कोरोनासाठी राखीव निधी ठेवण्यात आलेला आहे. तरीही जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील विकासाची नोंद घेऊन त्या विकास कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येणार आहे. सोलापूर महापालिकेची हद्दवाढ झालेल्या भागातील जिल्हा परिषदेच्या 36 शाळांच्या दुरुस्ती करीता पहिल्या टप्प्यात दोन कोटीचा निधी मंजूर करण्यात येत असल्याचे सांगून उर्वरित निधीही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     वीज वितरण कंपनीने कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाची वीज जोडणी खंडित करू नये असे निर्देश पालकमंत्री भरणे यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांकडे असलेल्या वीज बिलाच्या थकबाकी बाबत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची ऊर्जा मंत्री यांच्याकडे मुंबई येथे पुढील दोन दिवसांनी बैठक घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी ऊर्जा मंत्र्यांना विनंती करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

      कोरोना काळात कोविड सेंटर मध्ये काम केलेल्या व आज  पर्यंत मानधन मिळाले नाही अशा सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित मानधन मिळण्यासाठी आरोग्य विभागाने योग्य ती दक्षता घ्यावी. कोरोना काळात सर्वांनी चांगले काम केले असून रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अजून करून गेलेला नाहीत्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी. राज्यात ऑक्सिजन निर्मिती सोलापूर जिल्हा स्वयंपूर्ण झालेला पहिला जिल्हा आहेअशी माहिती श्री. भरणे यांनी यावेळी दिली.

     महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अतर्गत जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कामे प्रस्तावित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्याकडे मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला तात्काळ पिक कर्ज पुरवठा केला पाहिजे असे निर्देश पालकमंत्री भरणे यांनी यावेळी दिले. सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात सुरु असलेल्या कामाविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या तक्रारीच्या अनुषंगाने एकंदरीतच स्मार्ट सिटी कामाच्या गति बाबत पुढील पंधरा दिवसात एक स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात येऊन या अंतर्गत च्या सर्व कामांना गती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

      यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वीज वितरण कंपनीने थकबाकी अभावी वीज जोडणी तोडू नये असे सूचना केली तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्जाचे वाटप तालुका निहाय करावे असे सांगितले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गौण खनिजाचा जिल्ह्याचा तीन कोटीचा निधी असून सदरील निधी वाटपाबाबत पालकमंत्री च्या अध्यक्षतेखाली समिती असून त्या समितीकडून निधी वाटपाबाबत निर्देश देण्यात येतील असे सांगितले. तसेच जिल्ह्यात प्रशासनाकडून विविध ठिकाणी जप्त केलेली वाळू घरकुलाच्या कामासाठी देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही श्री शंभरकर यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी विविध विषयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेकडून त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

      प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दराडे यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 खर्चास मान्यता देणेसन 2021-22 चा खर्चमागील बैठकीचे इतिवृत्त व अनुपालन या विषयाची माहिती बैठकीत सादर करून त्यावर सविस्तर चर्चा झाली.

      यावेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुखसचिन कल्याणशेट्टीराम सातपुतेसंजय शिंदेशहाजीबापू पाटीलयशवन्त मानेसमाधान औताडेराजेंद्र राऊत सह अन्य समिती सदस्य उपस्थित होते.

सन 2020-21 च्या 574 कोटीच्या खर्चास मान्यता

           पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नियोजन समितीकडून सन 2020-21 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 574.12 कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली. यात सर्वसाधारण योजनेच्या 421.99 कोटीअनुसूचित जाती उपयोजना च्या 151.38 कोटी व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 75 लाख अशा एकुण 574 कोटी 12 लाखाच्या खर्चास समितीने मान्यता प्रदान केली.

विविध ठरावांना मंजुरी

    ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नावाने राज्यस्तरावरून शासनाने योजना जाहीर करावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली.

तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील सदस्यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल समिती सदस्यांनी पालकमंत्र्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला.

लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांच्या सूचना

        जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांनी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात वीजरस्तेदुरुस्तीपाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करणेपीक कर्ज वाटपरोजगार हमी योजनेची कामे प्रस्तावित करणेस्मार्ट सिटी योजनेअंतर्गत चे कामे गतीने होणेसमशान भूमी ची कामे होणे तसेच विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देणे आदी बाबत मागण्या व सूचना करून त्या वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले.

श्रद्धांजली

       ज्येष्ठ नेते माजी आमदारमाजी मंत्री स्वर्गीय गणपतराव देशमुख तसेच कोरोना मुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना जिल्हा नियोजन समितीने दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.

नवीन सदस्यांचा सत्कार

      जिल्हा नियोजन  समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुष्पगुच्छ देऊन केला.

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads