महाराष्ट्र
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयावर भव्य असा विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा
सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा.
पंढरपूर:- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सचिन शिंदे- पाटील यांच्या नेतृत्वात राज्यातील तरुणासाठी सैन्य भरती, स्पर्धा परीक्षा अशा विविध मागण्यासाठी भव्य असा आक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी चौकातून शेकडो विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरोना व लॉकडाऊन मुळे विद्यार्थ्यांची सैन्य भरती, पोलीस भरती व विविध स्पर्धा परीक्षा शासनाच्या वतीने बंद करण्यात आले होते त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे एजबार झाले आहेत त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे विचार करून प्रशासनाच्या वतीने त्यांना दोन वर्ष वयोमर्यादा वाढवून मिळावे व भरती प्रक्रिया तातडीने चालू कराव्यात. परीक्षार्थींना प्रवासासाठी बस, रेल्वेने जाण्यासाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध कराव्या. मुलींसाठी परीक्षा केंद्र त्यांचेच जिल्हे मिळावे, सर्व शासकीय पदांची भरती करताना अर्ज ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावे तसेच विद्यार्थ्यांचे शासकीय परीक्षा फी शंभर रुपये करावी व शैक्षणिक दाखले तहसील कार्यालयात जलद गतीने मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी अशा विविध मागण्या या ठिकाणी मांडण्यात आल्या.
शासनाने या मागण्यांची लवकर दखल न घेतल्यास हजारो विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन मुंबई च्या आझाद मैदानावर करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन शिंदे- पाटील यांनी दिली.
या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथील पाटील सरांच्या करिअर अकॅडमी तील पाच विद्यार्थ्यांनी 45 कि मी अंतर धावत या मोर्चामध्ये सहभागी झाले.
या मोर्चास शेकडो विद्यार्थ्या तसेच संघटनेचे नेते सचिन शिंद- पाटील, विजय रणदिवे, शहाजान शेख, अजित बोरकर, अमर इंगळे, सचिन आटकळे, बाहुबली सावळे, नाना चव्हाण, मनोज गांवधरे, सोमनाथ घोगरे, नवनाथ मोहिते, सचिन ताटे, आदी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment