महाराष्ट्र
पंढरपुर - तिऱ्हे- सोलापूर रस्त्यासाठी टाकळी सिकंदर येथे भाजपाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन
सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा
मोहोळ:- दि- 24/09 रोजी भाजप च्या वतीने पंढरपूर- तिऱ्हे-सोलापूर या रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आ. समाधान (दादा) आवताडे
जिल्हाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वात टाकळी शिकंदर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना आ.समाधान (दादा) आवताडे म्हणाले की सरकारने लवकरात लवकर रस्ता नाही केला तर यापुढील आंदोलन उग्र करण्यात येईल असा इशारा सरकारला दिला, आणि हा राज्य महामार्ग असल्यामुळे राज्य शासनाचा निधी ह्या रस्त्याला उपलब्ध करावा लागतो. जर हा नॅशनल हायवे असता तर केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम मार्गी लागले असते, तसेच विधान परिषद आ. प्रशांत परिचारक म्हणाले की, वेळोवेळी रस्त्याची मागणी करून पाठपुरावा केला पण हे सरकार केवळ विरोध म्हणून रस्त्याला निधी देत नाही असे बोलताना सांगितले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले की सरकारने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून नाही दिला तर यापुढील आंदोलन हे उग्र करू असे त्यांनी सांगितले.
या आंदोलनास पंढरपूर- मंगळवेढा चे लोकप्रिय आमदार समाधान (दादा) आवताडे,जिल्ह्याचे विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक ,जिल्हा परिषद बांधकाम विभाग सभापती विजयराज डोंगरे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,दिलीप घाडगे,युवा नेते प्रणव परिचारक, पंचायत समिती सदस्य प्रशांत भैय्या देशमुख,शंकरराव वाघमारे, भास्कर कसगावडे, बादल सिंह ठाकुर, सुनील चव्हाण,पांडुरंग बचुटे, दिपक गवळी,बापूसाहेब चव्हाण, सुभाष माने सर,लक्ष्मण तात्या धनवडे,दामाजी चे संचालक राजनभैय्या पाटील, राजीव बाबर, सुभाष मस्के सर माऊली हळणवर, संजय माळी,भैय्यासाहेब कळसे, युवा मोर्चा अध्यक्ष लाला पानकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सुनील काका भोसले,तसेच भाजपाचे पंढरपूर-मोहोळ-मंगळवेढा चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment