महाराष्ट्र
अंत्रोळी गावामध्ये मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबीर संपन्न..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर दि.२९ सप्टेंबर : अंत्रोळी गावामध्ये मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबीर पार पडली .
लायन्स मथुराबाई फतेहचंद दमाणी हॉस्पिटल ,लायन्स ब्रिजमोहन फोफलीया नेत्रालय (धर्मार्थ रुग्णालय) याच्या विद्यमाने ही शिबीर पार पडली या शिबिरामध्ये तब्बल ७८ लाभार्थींची तपासणी करण्यात आली यामध्ये १३ लोकाना ऑपरेशनसाठी सांगितले आहे व या शिबीरास जास्त वृद्धांचा समावेश होता.
हि शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शिवसेना वाहतूक संघटना जिल्हाप्रमुख गणेश कर्वे,शिवसेना दक्षिण तालुका उपप्रमुख अशोक हजारे, अंत्रोळीचे माजी सरपंच अनंता कर्वे तसेच अंत्रोळी गावचे ग्रामविकास अधिकारी गाडेकर भाऊसाहेब तसेच सर्व ग्रामपंचायत टीम सरपंच कोमलताई करपे, उपसरपंच सोनालीताई खरात, ग्रामपंचायत सदस्य करण कांबळे,बाबासाहेब बंडगर,बापूसाहेब शेख,ईन्नुस शेख,माया सलगरे, सारिका थोरात, मा.सौ पूजा थोरात तसेच ग्रामपंचायत कर्मचारी नाथाजी केंगार,संजय कोळी होते.
या शिबिरास डॉक्टर शिवाजी पाटील, सहाय्यक डॉक्टर रमेश देशपती, जनसंपर्क अधिकारी सुरज जाधव ,सहाय्यक अंजली गायकवाड लक्ष्मीकांत गायकवाड हे सर्व उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment