कंदलगाव येथे दिलीपरावजी माने संपर्क कार्यालय युवा मंच शाखेचे व सहारा क्रीडा मंडळाचे उद्घाटन माजी आमदार दिलीपरावजी माने यांच्या हस्ते संपन्न.. - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

कंदलगाव येथे दिलीपरावजी माने संपर्क कार्यालय युवा मंच शाखेचे व सहारा क्रीडा मंडळाचे उद्घाटन माजी आमदार दिलीपरावजी माने यांच्या हस्ते संपन्न..



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
  सोलापूर : दि.२१ सप्टेंबर रोजी माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते सर्व प्रथम त्यांनी सहारा क्रीडा मंडळाचे उद्घाटन  जिल्हा परिषद केंद्र शाळेतील हाॅलीबाॅल क्रिडांगणाचे उद्घाटन  केले व त्यानंतर या ठिकाणी त्यांचा यथोचित सत्कार ही करण्यात आला.त्यांना हाॅलीबाॅल खेळाचे मोह न आवरल्यामुळे ते मैदान मध्ये दोन सर्विस करून खेळाची आवड असल्याचे दाखवून दिले.
त्यानंतर त्यांनी कंदलगाव येथील दिलीपराव (मालक)माने युवा मंच संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांनी केले.
यावेळेस त्यांचा संपर्क कार्यालयात युवा मंचच्या वतीने व ग्रामपंचायत कार्यालय कंदलगाव यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
       यावेळी बोलताना माजी आमदार दिलीपराव माने म्हणाले की  या मंचाने विधायक आणी विकास कामासाठी लक्ष द्यावं मी तुमच्या  प्रत्येक कामात मी तुमच्या पाठीशी उभा राहतो  बोलताना पुढे म्हणाले दैनिक शिवस्वराज्य च्या माध्यमातून कार्यकर्त्यांना असे आव्हान करतो की आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागा असे आव्हान कार्यकर्त्यांना मनोगतातून व्यक्त केले.
 या कार्यक्रमास  मार्केट कमिटी माजी उपसभापती गंगाधर बिराजदार, आप्पासाहेब काळे माजी जिल्हा परिषद सदस्य,  माजी मार्केट यार्ड उपसभापती चंद्रकांत खुपसंगे, मच्छिंद्र एवळे ग्रामपंचायत सदस्य मनगोळी,  कंदलगावचे सरपंच रावसाहेब पाटील,कंदलगाव चे सरपंच सविता वाघमारे,  कंदलगावचे माजी उपसरपंच सांयप्पा कांबळे, गुंजेगाव चे उपसरपंच तुकाराम भडकुंबे ,  अंत्रोळीचे ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब शेख, परशुराम राऊतराव, विकास पाटील , पापू सय्यद (पैलवान), डीएम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विकास पाटील ,अमीर शेख, दत्ता भाऊ पवार, बालाजी जाधव, समाधान जाधव ,गुंजेगाव चे माजी सरपंच किरण आठवले ,तुळजाराम नरोटे  आदी मान्यवर उपस्थित होते
       व या कार्यक्रमास दिलीपरावजी माने संपर्क कार्यालय युवा मंच शाखेचे  अध्यक्ष सद्दाम भाई शेख , उपाध्यक्ष अंबादास साबळे, सचिव दस्तगीर शेख,  उपसचिव लखन राऊतराव, सदस्य राजू वाघमोडे व नवाज शेख,तरबेज शेख, कंदलगावचे इलाई शेख,मोहसिन शेख (मिस्त्री),पत्रकार नारायण घंटे ,पत्रकार राठोड ,तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads